18 नोव्हेंबर  2026

Created By:  Bhakti Gothankar

 छत्रपती शिवाजी महाराजांचे  'अभेद्य किल्ले'जे प्रत्येक मराठी माणसाने पाहिलेच पाहिजे

शिवनेरी किल्ला -  छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान जुन्नरजवळ असलेला हा किल्ला प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचं ठिकाण आहे. या किल्ल्यावर 19 फ्रेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती  शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवजन्मस्थान , शिवाई देवींचं मंदिर, उंच कडे, संरक्षण रचना,   पाण्याची टाकी पाहण्यासारखी आहे.

रायगड किल्ला- स्वराज्याची राजधानी मराठा साम्राज्याच्या इतिहासातील हा अत्यंत  महत्त्वाचा किल्ला आहे. 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक याच गडावर झाला. महादरवाजा, राजदरबार, जगदीश्वराचं मंदिर, हिरकणी बुरूज, महाराजांची समाधी असल्याने प्रत्येक मराठी माणसासाठी हे मंदिर आहे. 

सिंहगड किल्ला सिंहगड म्हणजेच आधीचा कोंढाणा. तानाजी मालुसरे  यांनी शर्थींची पराकाष्टा करून स्वराज्यासाठी हा किल्ला जिंकला. या किल्ल्यावर तानाजी मालुसरे यांची समाधी, कल्याण दरवाजा, पुणे दरवाजा, देवटाके आणि  सह्याद्रीचा नजारा पर्यटकांना आकर्षित करतो.

प्रतापगड किल्ला महाबळेश्वरजवळ असलेला हा किल्ला म्हणजे  छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्या भेटीची साक्ष देणारा आहे. 10 नोव्हेंबर 1659 रोजी  याच ठिकाणी महाराजांनी अफजलखानाचा वध केला. भवानी मंदिर, महादरवाजा, किल्ल्याची रचना पाहण्यासारखी आहे.

हरिश्चंद्रगड -  कोकणकड्याचं थक्क करणारं सौंदर्य हरिश्चंद्रगड हा इतिहास आणि निसर्गप्रेमींसाठी खास आहे. कोकणाचं दिसणारं विहंगम दृश्य येथील आकर्षण आहे. केदारेश्वर गुहा, तारामती शिखर, हरिश्चंद्रेश्वर मंदिर पाहण्यासारखे आहे.

जंजिरा किल्ला -  अजिंक्य राहिलेला जलदुर्ग अरबी समुद्रात खडकाळ बेटावर हा किल्ला उभा  आहे. अनेक आक्रमण आणि वेढे सहन करूनही जंजिरा किल्ला शत्रूच्या  ताब्यात गेला नाही. 40 फूट उंच  तटबंदी, तोफा, 11 बुरूज हे त्याचं वैशिष्ट्य आहे.

टीप : छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांसंबंधित  ही माहिती महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या  अधिकृत संकेतस्थळावरून घेण्यात आली आहे.  आम्ही कोणताही दावा करत नाही.