विमान प्रवासात थर्मामीटर
न्यायला का मनाई असते ?
Created By: Atul Kamble
20 FEB 2026
विमान हजारो फूट उंचीवरुन उडत असते.त्यामुळे प्रत्येक बाबींची काळजी घेतली जाते. काही गोष्टींना विमानात न्यायला परवानगी नाकारली जाते.
विमान प्रवास करताना सोबत थर्मामीटर न्यायला देखील सक्त मनाई असते. बऱ्याच थर्मामीटरमध्ये पारा (Mercury)असतो.
पारा म्हणजे मर्क्युरी हा धातू ॲल्युमिनियमचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो. बहुतेक विमाने ही ॲल्युमिनियम या धातूपासून बनलेली असतात.
तापमान मोजण्याचे थर्मामीटर फुटले आणि त्यातील पारा बाहेर पडून तो विमानाच्या कोणत्याही ॲल्युमिनियम भागाच्या संपर्कात आला तर धोका निर्माण होतो.
पारा हा धातूला अत्यंत वेगाने गंजवून (Corrode) कमकुवत करतो, ज्यामुळे विमानाला मोठा अपघात होण्याची भीती असते.
पारा या धातूची ॲल्युमिनियमसह रासायनिक प्रक्रिया होते, ज्याला अमालगम कॉरोझन म्हणतात.
पारा विमानाच्या सांगाड्याच्या (Structure) संपर्कात आला, तर त्याने ॲल्युमिनियमची मजबूती कमी होते. ज्यामुळे विमानाचे मोठे नुकसान होऊ शकते.
पारा हा एक प्रकारचा द्रव धातू असून तो सांडल्यास विमानाचे
भाग
खरोखरच कमकुवत होऊन त्यांना छिद्र पाडू शकते.
म्हणून, विमान प्रवासामध्ये पारा असलेले तापमापक (Thermometer) नेण्याची परवानगी दिली जात नाही.
5.65 लाखांपासून सुरु होते या 7 सिटर कारची किंमत