पाण्याच्या बाटलीचा नियमित वापर करताय, या गोष्टी लक्षात ठेवा
15 June 2025
Created By: Shweta Walanj
पाण्याची बाटली रोज वापरत असाल तर ती दररोज स्वच्छ करणे आवश्यक आहे.
उन्हाळ्यात किंवा दमट हवामानात बॅक्टेरिया लवकर वाढतात, त्यामुळे दर 1-2 दिवसांनी स्वच्छ करावी.
जर बाटली थेट तोंडाला लावत असाल, तर ती प्रत्येक दिवशी स्वच्छ धुणे अत्यंत गरजेचे आहे.
स्टील व ग्लास बाटल्या कमी वेळा पण नीट 2 - 3 दिवसांनी धुता येतात. साबण व गरम पाण्याने धुणे महत्त्वाचे आहे.
जर बाटलीतून वास येत असेल किंवा आत फंगस दिसत असेल, तर ती लगेच स्वच्छ करावी.
प्रत्येक वापरानंतर बाटली धुतल्याने बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता कमी होते आणि आरोग्य सुरक्षित राहते.
हे सुद्धा वाचा : रेखा यांच्याप्रमाणेच बहीण देखील सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल...