लोकसभा निवडणुकी दरम्यान रतन टाटा यांनी मोठ आवाहन केलय.

देशातील सर्वात मोठ्या औद्योगिक घराण्यातून येणाऱ्या रतन टाटा यांनी देशातील जनतेला अपील केलय. 

रतन टाटा हे देशातील  आदर्श व्यक्तीमत्व असून  त्यांचा जनमानसावर  मोठा प्रभाव आहे.

त्यामुळे रतन टाटा यांच्याकडून करण्यात आलेल हे आवाहन, अपील जनता तितक्याच गांभीर्याने घेईल. 

रतन टाटा यांनी मुंबईकरांना घरातून बाहेर पडून  जास्तीत जास्त मतदान  करण्याच अपील केलय. 

मुंबईत सोमवारी मतदान आहे. मी मुंबईकरांना आग्रह करतो की. त्यांनी जबाबदारीने जास्तीत जास्त मतदान करावं. 

मागच्या चार टप्प्यात मतदारांमध्ये म्हणावा तितका उत्साह दिसला नाही.  त्यामुळे वोटिंग टर्नआऊट  कमी दिसलाय.