5 मार्च 2026
Created By: Soneshwar Patil
कार चालवताना काच उघडून गाडी चालवल्यास मायलेज वाढते का, असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो.
इंधनाची बचत करण्यासाठी काहीजण एसी बंद करून कारच्या काचा उघडून गाडी चालवतात.
मात्र तज्ज्ञांच्या मते, काचा उघडून गाडी चालवणे मायलेज वाढवण्याऐवजी कमीही करू शकते.
कारण गाडी हवेला चिरत सहज पुढे जाऊ शकेल. पण गाडीच्या काचा उघड्या असतील तर हवा थेट केबिनमध्ये प्रवेश करते.
त्यामुळे कारचे एअरोडायनॅमिक संतुलन बिघडते. याचा परिणाम इंजिनवर होतो आणि गाडीला पुढे जाण्यासाठी अधिक शक्ती वापरावी लागते.
इंजिनवर जास्त ताण आल्यामुळे इंधनाचा वापर वाढतो आणि परिणामी मायलेज कमी होऊ शकते.