हे पदार्थ खा आणि हृदयरोगाला दूर पळवा

30 June 2025

Created By: Atul Kamble

हार्टचा प्रॉब्लेम केवळ वयस्कांमध्ये नव्हे तर युवकांनाही त्रास देत आहे. डाएटमध्ये काही पदार्थांचा समावेश केला तर फायदा मिळू शकतो

विरघळणाऱ्या फायबरने भरपूर असलेले ओट्स शरीरातील खराब कॉलेस्टॉल कमी करण्यास मदत करते.आर्टरिजना स्वच्छ ठेवते

ओमेगा-३ फॅटी एसिड आणि एंटीऑक्सिडेंट्सने भरपूर असलेले बदाम आणि अक्रोड हृदयाला सुजेपासून वाचवतात आणि हृदयाचे आरोग्य राखतात

फॅटी फिशमध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा-३ असते जे रक्तातील गुठळी बनण्यापासून रोखते, हृदयविकाराचा धक्क्यापासून रोखते

हिरव्या पालेभाज्यात विटामिन आणि नायट्रेट्सने भरपूर असतात. ज्यामुळे ब्लडप्रेशर नियंत्रित रहाते आणि आर्टरिज मजबूत बनवते

टॉमेटोत लायकोपीन नावाचे एंटीऑक्सिडेंट असते.कॉलेस्टॉलचे ऑक्सीकरणाला रोखून हृदयाची रक्षा करते

बीन्स आणि डाळीत फायबर, प्रोटीन आणि पोटॅशियम भरपूर असते. हे कॉलेस्ट्रॉल घटवून ब्लड प्रेशर नियंत्रित करते

ऑलिव्ह ऑईलमध्ये हेल्दी फॅट्स भरपूर असते. ते हार्ट वेसल्सना लवचिक आणि हेल्दी बनवते आणि सूज कमी करते

ब्ल्यु बेरीज फळात फ्लेवोनॉयड्स असते जे ब्लड वेसल्सची कार्यक्षमता वाढवते. आणि हायब्लड प्रेशर रोखते

( डिस्क्लेमर - ही माहीती केवळ सर्वसामान्य माहीतीवर आधारित आहे. योग्य माहीतीसाठी डॉक्टरांशी संपर्क करावा )