ब्लॅक मांबा आणि किंग कोब्रात जुंपली तर कोण जिंकेल ?
01 March 2025
Created By: Atul Kamble
जगात सांपाच्या अनेक जाती विषारी आणि घातक आहेत.त्यात किंग क्रोबा आणि ब्लॅक माम्बा याची बातच निराळी
या दोन सापात लढाई झाली तर कोण जिंकणार ? हा प्रश्न थोडा विचित्र आहे पण उत्तर इंटरेस्टींग आहे
या दोन सापांच्या विषाचा विचार केला तर ब्लॅक माम्बाचे विष किंग कोब्रापेक्षा ५ पट जास्त विषारी आहे
आकाराचा विचार केला तर किंग कोब्रा आकाराने ब्लॅक माम्बा पेक्षा निश्चितच मोठा आहे
किंग कोब्रा दंश करण्यापूर्वी आपले अस्तित्व जाणवू देतो, परंतू ब्लॅक माम्बा तसे न करता थेट हल्ला करतो
ब्लॅक माम्बा शरीराचा एक तृतीयांश भाग हवेत उचलून टॉक्सिन इंजेक्ट करण्याचा करण्याचा प्रयत्न करतो
किंग कोब्रा लाजाळू असतात,परंतू त्यांना छेडल्यास साक्षात यमराजाला आवतन दिल्या सारखे आहे
लढाई झाली तर ब्लॅक माम्बाचा पराभव होतो. कारण किंग कोब्रा माम्बासारख्या विषारी सापाचीही शिकार करतात
दलिया वा ओट्स...दोन्हींपैकी ब्रेकफास्टसाठी कोण बेस्ट ?