जगातली सर्वात महागडी पुस्तकं कोणती ?

02 July 2025

Created By: Atul Kamble

पुस्तकं केवळ ज्ञानाचा स्रोत नाहीत. काही पुस्तकं इतकी दुर्लभ असतात की त्यांची किंमत करोडो रुपयात असते.

अशी पुस्तकं इतिहास,विज्ञान आणि कलेशी जोडलेली असतात.त्यांच्यासाठी श्रीमंत लोक मोठी रक्कम खर्च करतात

जगातील सर्वात महागडे पुस्तक कोडेक्स लीसेस्टर आहे. ज्यास १९९४ मध्ये बिल गेट्स यांनी २५७ कोटी रुपयांत विकत घेतले

या पुस्तकाला लिओनार्डो दा विंची याने लिहिले होते. ज्यात पाण्याचा मार्ग, खगोल विज्ञान आणि निसर्गाशी संबंधीत महत्वाच्या गोष्टी लिहील्यात

'बुक ऑफ मॉर्मन'चा मुळ आराखडा साल २०१७ मध्ये  २९२ कोटीला विकला गेला.हे पुस्तक मॉर्मन धर्मासाठी महत्वाची मानले जाते

 या हस्तलिखिताचा केवळ २८ टक्के हिस्सा आज शिल्लक आहे.परंतू मॉर्मन इतिहासाचा मोठा दस्ताऐवज मानला जातो

'बे सॉल्म बुक', १६४० मध्ये छापले होते. हे ब्रिटीश नॉर्थ अमेरिकेचे छापलेले पहिले पुस्तक होते. जे २०१३मध्ये सुमारे ११९ कोटींना विकले गेले

रॉथ्सचाईल्ड प्रेयर बुक, १६ व्या शतकातील एक प्रार्थना पुस्तक आहे. ही पुस्तक सुंदर कलाकुसरीसाठी प्रसिद्ध आहे. ते ११४ कोटींना विकले गेले

 जॉन जेम्स ऑडुबॉनचे पुस्तक द बर्ड्स ऑफ अमेरिका मध्ये ४३५ पक्ष्यांची मोठी आणि सुंदर चित्रं आहेत.हे पुस्तक २०१० मध्ये सुमारे ९७ कोटींना विकले गेले

 विल्यम्स शेक्सपिअरची फर्स्ट फोलिओ,१९२३ मध्ये छापले होते. त्यात त्यांच्या नाटकांचा पहिला संग्रह होता. साल २०२० मध्ये हे पुस्तक ८३ कोटींना विकले गेले

गुटेनबर्ग बायबल जगातले पहिले छापलेले पुस्तक मानले जाते. ते १९८७ मध्ये ४५ कोटींना विकले गेले.याने छपाईच्या जगात क्रांती आणली

कॅन्टरबरी टेल्स,१४७७ मध्ये विल्यम्स कॅक्सटन यांनी छापले होते. सुरुवातीला छापल्या इंग्रजी पुस्तकांपैकी एक आहे. त्याची किंमत ६२ कोटी आहे.