महाभारताच्या युद्धासंदर्भात अनेक गोष्टी आहेत. पण श्री कृष्णाने महाभारताच्या युद्धासाठी कुरुक्षेत्रच  का निवडलं?

श्री कृष्णाने महाभारतासाठी कुरुक्षेत्राची भूमी निवडली. प्रभुंनी आपल्या सेवकांना जमीन निवडायला  सांगितलेली. 

असं म्हणतात भगवान कृष्णाला भीती होती की, भाऊ-भाऊ, गुरु-शिष्य आणि नातेवाईकांना मरताना पाहून कौरव, पांडव कुठली तडजोड करतील.

म्हणून कृष्णाने अशी भूमी निवडलेली, जिथे क्रोध, द्वेष मोठ्या प्रमाणात असेल. 

कृष्णाच्या सर्व दूतांनी दिशांचा आढावा घेतला. दूताने सांगितलं की, कुरुक्षेत्रावर मोठ्या भावाने छोट्याची हत्या केलीय.

दूताकडून माहिती घेऊन कृष्णाने निश्चित केलं की, ही भूमी गुरु-शिष्य, भावा-भावासाठी उपयुक्त आहे. 

युद्धा दरम्यान परस्परावर प्रेम उत्पन्न होणार नाही, म्हणून  श्री कृष्णाने कुरुक्षेत्राची  निवड केली.