जन्म दाखला आता सर्वात महत्वाचे कागदपत्रे ठरणार आहे. त्यावर तुमची सर्व कामे होणार आहेत.

हिवाळी अधिवेशनात जन्म आणि मृत्यू संशोधन विधेयक 2023 संमत झाले आहे.

विधेयकावर आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही सही केली आहे. आता १ ऑक्टोंबरपासून हे लागू होणार आहे.

आता जन्म दाखल्यावरुन आधार कार्ड, पासपोर्ट, लायसन्स, सरकारी योजना सर्वच दाखले मिळणार आहेत.

 या विधेयकामुळे आधार कार्डपेक्षाही जन्म दाखला महत्वाचा झाला आहे. 

मुलाचा जन्म दाखला त्याच्या आई-वडिलांच्या आधार कार्डशी जोडला जाणार आहे. 

जन्म दाखल्यासंदर्भातील या विधेयकामुळे मतदार यादीत नाव येणेही सोपे होणार आहे.