तुमच्या पॅनकार्डवर कोणी लोन तर घेतलं नाही ना? असं तपासा

26 जुलै 2025

Created By:  राकेश ठाकुर

भारतात पॅनकार्ड एक महत्त्वाचं दस्ताऐवज आहे. इनकम टॅक्स रिटर्नपासून बँक खातं उघडण्यासाठी मदत करते. 

पॅनकार्डचा वापर इतर कामांसाठीही केला जातो. पण काही जण फसवणूक करण्यासाठी याचा वापर करत आहेत.

लबाडी करणारे लोकं दुसऱ्याच्या नावाने कर्ज घेण्यासाठी पॅनचा वापर करतात. 

अनेकदा पॅनकार्ड धारकाला याची जाणीन नसते. त्यांचा क्रेडिट स्कोअरसह आर्थिक बाबींवर परिणाम होऊ शकतो. 

फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही तपासणी करत राहा. जेणेकरून तुम्हाला वेळेवर सर्वकाही माहिती पडेल. आज अशी पद्धत सांगत आहोत त्याने तुम्हाला तुमच्या कर्जाची स्थिती तपासू शकता. 

पेटीएम किंवा पैसाबाजार यासारख्या विश्वसनीय फिनटेक अॅपवर जा. साईट अधिकृत आहे की याची पडताळणी करा. तिथे लॉगिन करा आणि ओटीपी व्हेरिफाय करा.

यानंतर लोन किंवा क्रेडिट हेल्थ सेक्शन चेक करा. येथे तुमच्या नावावर लोन तर नाही याची पडताळणी करा. 

जर लोन असेल तर संबंधित बँकेशी संपर्क करा. तसेच सायबर क्राइम पोलिसात किंवा पोर्टलवर तक्रार करा.

टेस्ला नावाचा अर्थ काय? एलोन मस्कने हेच नाव का निवडलं?