09 Sap 2023

गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणुकीची संधी मिळणार आहे. तसेच यासाठी सुटसुद्धा मिळणार आहे.

सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम (SGBs) 2023-24 च्या माध्यमातून ही संधी मिळणार आहे. 11 सप्टेंबरपासून ही योजना सुरु होत आहे.

गुंतवणूकदार 15 सप्टेंबरपर्यंत या योजनेत गुंतवणूक करु शकतात. यंदा या योजनेत 5,923 रुपये प्रती 1 ग्रॅम हा दर निश्चित केला आहे.

सोन्याची गुंतवणूक ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करता येईल. ऑनलाइनसाठी 50 रुपये सुट मिळणार आहे. 

सॉवरेन गोल्ड बॉन्ड एक सरकारी बॉन्ड आहे. या बॉन्डचे रुपातंर डीमॅटमध्ये करता येते. 

 सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजनेत 24 कॅरेट म्हणजे 99.9 टक्के शुद्ध सोन्यात गुंतवणूक केली जाते. तसेच 2.50 टक्के वार्षिक व्याज मिळते.

 SGB मध्यमातून आर्थिक वर्षात कमीत कमी 1 ग्रॅम तर जास्तीत जास्त 4 किलो सोने घेता येईल.

सॉवरेन बॉन्डची  मॅच्योरिटी पीरियड 8 वर्षांचा आहे. मॅच्योरिटी झाल्यावर कोणताही कर द्यावा लागत नाही.