19 जुलै 2025
Created By: राकेश ठाकुर
सोन्याचे भाव सातत्याने वाढत असल्याने खरेदी करणं आवाक्याबाहेर गेलं आहे. पण खरेदी करण्याचा मोह काही आवरत नाही.
सोनं खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. कारण इतके पैसे खर्च करताना खात्री करावी.
सोन्याची दागिने खरेदी करण्यापूर्वी त्यावर बीआयएस हॉलमार्क तपासावा. त्यावर सोन्याची खात्री असते.
दागिने खरेदी करताना त्याची पावती घेणं आवश्यक आहे. भविष्यात परतफेड, दुरुस्ती किंवा देवाणघेवाण करण्यास मदत होते.
दागिने घडवण्यासाठी केलेला खर्च योग्य आहे की नाही ते तपासून घ्या. कारण अनेकदा मेकिंग चार्जच्या नावाखाली फसवणूक करतात.
सोन्याचं कॅरेट हे त्याच्या शुद्धतेवर ठरवले जाते. यासाठी 24, 23, 22, 18 आणि 14 कॅरेट असते. 24 कॅरेट एकदम शुद्ध सोने असते.
सोन्याचे दागिने बदलणे किंवा परत करण्यासाठी काही नियम आहेत. त्याची माहिती असणं आवश्यक आहे.
दागिन्याचे वजन डिजिटल मशिनवर तपासावं आणि कोणीतरी सोबत असावं. दागिन्यांमध्ये इतर गोष्टी मिसळून फसवणूक केली जाते. ही बाब लक्षात ठेवा.
दागिने खरेदी करण्यापूर्वी एक दोन दुकानात माहिती घ्या. यामुळे तुम्हाला योग्य ती माहिती मिळेल.