NPS वा UPS कोणती योजना योग्य ? कुठे मिळणार जास्त लाभ
25 August 2024
Created By: Atul Kamble
केंद्राने नॅशनल पेन्शन स्कीमच्या धर्तीवर समांतर UPS नवी योजना सुरु केलीय
ही योजना खासकरुन सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असून यात निश्चित रक्कम पेन्शन म्हणून मिळणार
युनिफाईड पेंशन स्कीम (UPS)नूसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या योगदानावर पेन्शन मिळणार
ही पेन्शन 12 महिन्याच्या एव्हरेज बेसिकच्या 50 टक्के असणार आहे, NPS मध्ये निश्चित पेन्शनची तरतूद नाही
NPS अंतर्गत खरेदी केलेल्या एन्युटीवर पेन्शन दिली जात असते
कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर एश्योर्ड फॅमिली पेन्शन देखील मिळेल,जी पेन्शनच्या 60 टक्के असेल
तर NPS पेन्शन योजनेमध्ये सेवेदरम्यान मृत्यू झाल्यास फॅमिली पेन्शनची तरतूद
UPS एक सुरक्षित पेन्शन योजना आहे. तर NPS च्या गुंतवणूकीवर शेअर बाजाराची रिस्क असते
NPSमध्ये वेतनाच्या 10 टक्के ( बेसिक + डीए ) कपात होते.तर UPS मध्ये 10 टक्के रक्कम द्यावी लागते
सरकारतर्फे UPS मध्ये 18.5 टक्के योगदान केले जाते, तसेच 25 वर्षांनंतर फिक्स पेन्शन शिवाय एक ठराविक रक्कम मिळते.
UPSमध्ये महागाईनुसार ही पेन्शन वाढते. NPS मध्ये अनेक कर्मचाऱ्यांना कमी रक्कम मिळते
UPSमध्ये 10 वर्षांच्या सेवेनंतरही 10 हजार निश्चित पेन्शन मिळते.NPSमध्ये तरतूद नाही
UPS एनपीएसच्या तुलनेत चांगली योजना आहे.सोमनाथ कमिटीने म्हटलंय की UPS मध्ये 99टक्के सरकारी कर्मचारी सामील होतील.
सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली
सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली