Vitamin बी - 12 ची कमतरता होईल पूर्ण, हे पदार्थ खा 

1 october 2025

Created By: Atul Kamble

विटामिन बी -12 शरीरातील रक्तपेशी कायम ठेवण्यात मदत करते.याच्या कमतरतेने शरीरात अनेक समस्या निर्माण होतात

 विटामिन बी -12ची कमतरता एक सामान्य समस्या बनली आहे. यामुळे थकवा, दम लागणे,चक्कर येणे आणि त्वचा पिवळी पडणे असे त्रात होतात

विटामिन बी -12 ची कमतरता दूर करण्यासाठी अनेक सप्लीमेंट आहेत.तसेच नॉनव्हेज पदार्थातही विटामिन बी -12 असते.तरीही असे शाकाहारी पदार्थ आपण पाहूयात

आयुर्वेद तज्ज्ञ किरण गुप्ता यांच्या मते फळे, भाज्या तसेच काही पदार्थांत  विटामिन बी -12 असते.

विटामिन बी -12 साठी फर्मेटेड फूड्सचे सेवन करावे, उदा. भिजवून मोड आलेले मूग तुम्ही खाऊ शकता

डेअरी प्रोडक्ट्समध्येही विटामिन बी -12 असते, तुम्ही दही-भात खाऊ शकता.दह्यात विटामिन बी-12 असते

 काही फळे आणि भाज्यात विटामिन बी-12 असते. उदा.ब्रोकली,पालक,बीट,संत्री आणि एव्हाकाडो. यांचा रोजच्या आहारात समावेश करु शकता