जर उडत्या विमानात एखाद्याचा मृत्यू झाला तर काय केलं जातं?

27 फेब्रुवारी 2025

Created By : मयुरी सर्जेराव

उडत्या विमानात जर तुमच्या शेजारी बसलेल्या प्रवाशाचा मृत्यू झाला तर तुम्ही तिथून हलू शकत नाही.

कतार एअरवेजच्या विमानात नुकतीच अशीच एक धक्कादायक घटना घडली, ज्यामध्ये एका जोडप्याला मृतदेहासोबत बसण्यास भाग पाडलं  होतं

मेलबर्न ते दोहा या 15 तासांच्या विमान प्रवासात एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला, परंतु मृतदेह बाहेर काढण्याऐवजी, कर्मचाऱ्यांनी तो ब्लँकेटने झाकला

मिशेल रिंग आणि जेनिफर कॉलिन नावाच्या जोडप्यानं सांगितलं की ते व्हेनिसला निघाले आहेत. पण त्यांना मृतदेहासह इटलीला चार तास प्रवास करावा लागला

विमान इटलीला पोहोचल्यानंतरही त्यांना त्यांच्या जागी बसून राहण्यास भाग पाडण्यात आलं जेणेकरून त्यांच्या आधी मृतदेह खाली उतरवता येईल

मिशेलनं हा तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट अनुभव असल्याचं म्हटलं.

त्याच वेळी, या घटनेबाबत सोशल मीडियावर लोकांनी एअरलाइन्सच्या वृत्तीवर टीकाही केली