विमानातील सीट्स या निळ्या रंगाच्या का असतात?

06  january 2026

Created By:  Soneshwar Patil

लांब पल्ल्याचा प्रवास कमी वेळेत करायचा असेल तर विमान प्रवास हा सर्वसामान्य पर्याय बनला आहे. 

ज्यामध्ये विमानांच्या सीट्स निळ्या रंगाच्या असतात. पण यामागचं नेमकं कारण काय?

अनेकांना असं वाटतं की आकाश निळं असल्यामुळे विमानांच्या सीट्सही निळ्या असतात. मात्र हे कारण चुकीचं आहे.

तज्ज्ञांच्या मते, निळा रंग विश्वासार्हता, सुरक्षितता आणि शांततेचं प्रतीक मानला जातो.

विशेषतः ज्यांना विमानप्रवासाची भीती असते, अशा प्रवाशांसाठी निळा रंग मानसिकदृष्ट्या दिलासा देणारा ठरतो.

गेल्या अनेक वर्षांपासून विमानांमध्ये निळ्या रंगाच्या सीट्सचा वापर केला जात आहे.

या रंगामुळे तणाव कमी होतो आणि प्रवाशांना सुखद अनुभव मिळतो असं मानलं जातं.

तसेच निळा रंग गडद असल्यामुळे त्यावर धूळ, डाग किंवा घाण लवकर दिसून येत नाही.