आयब्रो केल्यानंतर स्किनवर  लगेच फोड येतात? तर करा हे उपाय 

25 सप्टेंबर  2026

Created By: Bhakti Gothankar

बारीक दाणे किंवा पुरळ आयब्रो केल्यानंतर स्किनवर बारीक फोड, पिंपल्स येतात. त्या ठिकाणी सतच खाज येते आणि स्किन खराब होते, काही सोप्या टिप्समुळे तुम्हाला यापासून आराम मिळू शकतो.

आयब्रो करताना स्किन टाईट ठेवा आयब्रो करताना स्किन नेहमी टाईट ठेवा,  नाहीतर यामुळे आयब्रोच्या आजूबाजूला  कट्स होण्याचे चान्सेस जास्त असतात.  त्यामुळे त्वचेवर बारीक जखमा होऊ शकतात.

वॅक्सिंगचा वापर महिला थ्रेडिंगपासून वाचण्यासाठी वॅक्सिंग करतात. चुकीचे वॅक्स निवडल्याने त्याचा परिणाम स्किनवर होतो.

आईसिंग आयब्रो केल्यानंतर त्वचा सेंसिटिव्ह होते. त्यामुळे त्वचा शांत होण्यासाठी त्यावर आयब्रो केल्यानंतर लगेचच आईसिंग करा. त्यामुळे पिंपल्स फोडी येत नाही

अॅलोवेरा जेल थ्रेडिंग केल्यानंतर अॅलोवेरा जेल लावा. जेल लावल्याने त्वचेला आराम मिळतो. त्यामुळे त्वचेची जळजळ होत नाही. 

हात आणि केमिकलयुक्त क्रिम आयब्रो केल्यानंतर वारंवार त्याठिकाणी हात  लावू नका.तसेच त्या भागावर कोणतेही केमिकलयुक्त क्रिम किंवा फेसवॉश,  ब्लीच लावू नका.

गुलाबजल आयब्रो केल्यानंतर थंड गुलाबजल आयब्रोला लावा.त्यामुळे त्वचा शांत होते आणि आयब्रो जवळची स्किन निरोगी राहते.

टीप :  वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची  आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही  किंवा समर्थनही देत नाही.. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी  त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.