वनिता खरातचा नवीन लुक चर्चेत, साडीमधील फोटोंनी वेधलं लक्ष

08 फेब्रुवारी 2026

Created By:  Soneshwar Patil

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम मराठी अभिनेत्री वनिता खरात नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते.

अशातच अभिनेत्रीने नुकतेच तिचे साडीमधील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या साडीमधील फोटोंमध्ये वनिता खूपच सुंदर दिसत आहे.

या साडीमध्ये तिने वेगवेगळ्या पोज दिल्या असून त्या सध्या चर्चेत आल्या आहेत.

या साडीवर तिने हिरव्या रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे. त्यासोबत तिच्या साडीवरील डिझाइन सर्वाचं लक्ष वेधून घेत आहे.

तिने या फोटोंना 'खामोशी भी अब सलीके से सजने लगी है' असं कॅप्शन दिलं आहे.