रिस्क फ्री गुंतवणूक  आणि दर 3 महिन्याला व्याज,  पोस्टाची जबरदस्त स्किम 

14 फेब्रुवारी  2026

Created By:  संजय पाटील

सिनिअर सिटीजन सेव्हींग स्कीम ही पोस्टाची  ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित योजना आहे. या योजनेत 60 आणि त्यापेक्षा अधिक वय असलेले गुंतवणूक करु शकतात. 

उपलब्ध माहितीनुसार,  या योजनेत किमान 1 हजार तर जास्तीत जास्त 30 लाख रुपये गुंतवणूक करता येते.  

एससीएसएस या योजनेचं एक वैशिष्ट्य आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास आयटी एक्टच्या 80 सी नुसार दीड लाख रुपयांपर्यंत कर सवलत आहे.

गुंतवणूकदारांच्या खात्यात  दर तिमाहीला गुंतवलेल्या रक्कमेवरील व्याज जमा केलं जातं. व्याजाच्या रक्कमेतून ज्येष्ठ नागरिक आपला खर्च भागवू शकतात.

पोस्टाच्या या योजनेची मॅच्युरिटी 5 वर्षांची आहे. गुंतवणूकदार ही मुदत 3 वर्षांसाठी वाढवू शकतो. मात्र ठराविक मुदतीआधी  रक्कम काढल्यास काही टक्के दंड द्यावा लागेल.

1 वर्षाआधी रक्कम काढल्यास व्याज मिळणार नाही. 1-2 वर्षादरम्यान रक्कम काढल्यास 1.5-2 % आणि  2-5 वर्षादरम्यान रक्कम काढल्यास 1 टक्के  इतकी रक्कम कापली जाईल.

या योजनेसाठी पती-पत्नी जॉइंट खातं उघडू शकतात. जॉइंट खातं उघडल्यास गुंतवणूकीची मर्यादा वाढते.