छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बलात्काराच्या गुन्ह्याला होती ही शिक्षा; दोन्ही हात...

28 ऑक्टोबर  2026

Created By: Priti Ved

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील सर्वोत्तम शासकांपैकी एक होते. त्यांचा इतिहास आजही स्फुरण भरवणारं आहे.

त्यांनी मुघल, डच, इंग्रज अशा क्रूर शासकांशी लढा देत दिल्लीपर्यंत भगवा फडकवला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महिला अत्यंत सुरक्षित असल्याचे सांगितले जाते. एकूण हा त्यांच्यासाठी सुवर्णकाळ होता.

कथांनुसार, महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली त्या सुमारास एका गावातील उच्चभ्रू मानसाने व्यभिचार केल्याचा गुन्हा समोर आला होता.

यावेळी महाराजांनी त्याचा एक हात आणि एक पाय कलम करण्याची कडक शिक्षा दिली होती. या शिक्षेला चौरंग शिक्षा देखील म्हणतात.