वर्ल्ड कप जिंकण्यात अपयशी ठरलेले खेळाडू, टीम इंडियाचे किती क्रिकेटपटू?

10 फेब्रुवारी  2026

Created By:  संजय पाटील

मायकल हसी याने ऑस्ट्रेलियाला 2010 साली झालेल्या वर्ल्ड कप फायनलपर्यंत पोहचवलं होतं. मात्र हसी कांगारुंना विजयी करण्यात अपयशी ठरलेला.

दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने कारकीर्दीत उल्लेखनीय कामगिरी केली. मात्र त्याला एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही.

सुरेश रैना टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत भारतासाठी शतक करणारा एकमेव फलंदाज आहे. मात्र रैनाला आयसीसी ट्रॉफीशिवाय निवृत्त व्हावं लागलं.

केन विलियमसनच्या नेतृत्वात 2021 साली न्यूझीलंड टी 20i वर्ल्ड कप फायनल खेळली होती.  मात्र न्यूझीलंडला उपविजेता म्हणून समाधान मानावं लागलं होतं.

बाबर आझम टी 20i मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. मात्र बाबर आझम याचीही खेळाडू म्हणून टी 20i वर्ल्ड कप जिंकण्याची प्रतिक्षा कायम आहे.

एबी डीव्हीलियर्स 2007, 2009, 2010, 2012, 2014 आणि 2016 असे 6 वर्ल्ड कप खेळला. मात्र दक्षिण आफ्रिकेला टी 20i वर्ल्ड कप जिंकता आला नाही.

वानिंदु हसरंगा यांच्या नावावर टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील 20 सामन्यांत 40 विकेट्सची नोंद आहे. वानिंदुला यंदा दुखापतीमुळे एका सामन्यानंतर स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलंय.

बांगलादेशचा ऑलराउंडर शाकिब अल हसन 2007 ते 2024 पर्यंत 9 वर्ल्ड कप खेळला. मात्र त्याच्या टीमला एकदाही उपांत्य फेरीतही पोहचता आलेलं नाही.

न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज टीम साऊथी याच्या नशिबीही टी 20i वर्ल्ड कप जिंकण्याचा योग नव्हता.

ऑस्ट्रेलियाचा माजी स्टार ऑलराउंडर शेन वॉटसन यालाही त्याच्या कारकीर्दीत एकदाही  टी 20i वर्ल्ड कप जिंकण्याचा अनुभव काय असतो हे जाणून घेता आलं नाही.