अभिषेक शर्माचा कारनामा, रसेलला पछाडत वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, काय केलं?

22  जानेवारी  2026

Created By:  संजय पाटील

टीम इंडियाचा युवा सलामीवीर अभिषेक शर्मा याने टी 20 क्रिकेटमध्ये 5 हजार धावा पूर्ण केल्या. 

अभिषेक शर्माने न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या टी 20i सामन्यात 84 धावा केल्या. अभिषेक यासह टी 20 क्रिकेटमध्ये वेगवान 5 हजार धावा करणारा फलंदाज ठरला

अभिषेकच्या निमित्ताने टी 20 क्रिकेटमध्ये वेगवान 5 हजार धावा पूर्ण करणाऱ्या फलंदाजांबाबत जाणून घेऊयात.

अभिषेकने अवघ्या 2 हजार 898 चेंडूत 5 हजार टी 20 धावा पूर्ण करण्याची कामगिरी केली. 

अभिषेकआधी हा विक्रम आंद्रे रसेलच्या नावावर होता. त्याने 2 हजार 942 चेंडूत 5 हजार टी 20 धावांचा टप्पा गाठला होता. 

ऑस्ट्रेलियाच्या टीम डेव्हिड याने 3 हजार 127 चेंडूत 5 हजार धावा पूर्ण केल्या होत्या.

इंग्लंडच्या विल जॅक्स याने 3 हजार 196 बॉलमध्ये 5 हजार धावा पूर्ण केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेल याने 3 हजार 239 बॉलमध्ये 5 हजार टी 20 धावा पूर्ण करण्याची कामगिरी केली आहे.