2 एप्रिल 2026
Created By: संजय पाटील
आयपीएल पदार्पणात एका खेळीत सर्वोच्च खेळीचा विक्रम ब्रँडन मॅक्युलम याच्या नावावर आहे. ब्रँडनने आयपीएल स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात आरसीबी विरुद्ध 158 धावांची खेळी केली होती.
मायकल हसी याने 2008 साली आयपीएल पदार्पणात पंजाब किंग्स विरुद्ध 116 धावा केल्या होत्या.
शॉन मार्श याने 2008 साली डेक्कन चार्जर्स विरुद्ध नाबाद 84 धावा केल्या होत्या.
कायल मायर्स याने 2023 साली दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध आयपीएल पदार्पणात 73 धावा केल्या होत्या.
कूपर कोनोली याने गुजरात टायटन्स विरुद्ध 19 व्या मोसमात 72 धावांची खेळी केली होती.
ग्रेमी स्मिथ याने 2008 साली डेक्कन चार्जस विरुद्ध पदार्पणातील सामन्यात 71 धावांची खेळी केली होती.
जेम्स होप्स याने 2008 साली चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध आयपीएल पदार्पण केलं. होप्सने त्या सामन्यात 71 धावा केल्या होत्या.