20 मार्च 2026
Created By: संजय पाटील
टीम इंडियाने 8 मार्च रोजी सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात न्यूझीलंडला पराभूत करुन टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या विजयानंतर आगरकर यांनी त्यांना 2027 च्या वनडे वर्ल्ड कपपर्यंत चीफ सिलेक्टर म्हणून करार वाढवून मिळावा, अशी मागणी केली.
मात्र बीसीसीआय अधिकाऱ्यांनी हे वृत्त फेटाळलं आहे. आगरकर यांनी कोणत्याही प्रकारे करार वाढवून मागितलं नसल्याचं बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय.
"आगरकरांचा करार संपल्यानंतर त्यांना वर्ल्ड कपपर्यंत करारवाढ मिळणार की ,नाही हे निश्चित होईल", असं अधिकाऱ्याने म्हटलं.
निवड समितीच्या अध्यक्षाला करार वाढवून मागण्याची गरज नसते. नियमानुसार निवड समिती अध्यक्ष 4 वर्ष त्या पदावर राहू शकतो. त्यासाठी स्वतंत्र परवानगीची गरज नसते, असंही अधिकाऱ्यांनी नमूद केलं.
अजित आगरकर यांनी जुलै 2023 मध्ये निवड समिती अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला होता. आगरकर यांच्या कार्यकाळात टीम इंडिया अनेक बदलातून जात आहे.
सध्या बीसीसीआय आयपीएलच्या 19 व्या मोसमाच्या तयारीत आहे. आयपीएलच्या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे.