6 एप्रिल 2026
Created By: संजय पाटील
गतविजेच्या आरसीबीने आयपीएल 2026 मध्ये सलग 2 सामने जिंकत अप्रतिम सुरुवात केली आहे. आरसीबीचे खेळाडू जबरदस्त कामगिरी करत आहेत.
आरसीबीचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने रविवारी 5 एप्रिलला विकेट्सचं द्विशतक झळकावलं. भुवनेश्वरने आयपीएल स्पर्धेत 200 विकेट्स पूर्ण केल्या.
सीएसकेचा युवा फलंदाज आयुष म्हात्रे हा भुवनेश्वर कुमार याची 200 वी शिकार ठरला.
भुवनेश्वर कुमार याने 192 व्या सामन्यात 200 विकेट्स पूर्ण केल्या. भुवी अशी कामगिरी करणारा पहिला वेगवान तर एकूण दुसरा गोलंदाज ठरला.
भुवी 2 वेळा पर्पल कॅप जिंकणारा एकमेव गोलंदाज आहे. भुवीने 2016 आणि 2017 साली सलग 2 वर्ष सर्वाधिक विकेट्स घेऊन पर्पल कॅप आपल्या नावावर केली.
आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम हा फिरकीपटू युझवेंद्र चहल याच्या नावावर आहे. चहल आतापर्यंत 224 विकेट्स मिळवल्या आहेत.
तसेच चहल भुवनेश्वरनंतर सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सुनील नारायण तिसऱ्या स्थानी आहे. सुनीलच्या नावावर 193 विकेट्सची नोंद आहे.