14 फेब्रुवारी 2026
Created By: संजय पाटील
टीम इंडियाने वर्ल्ड कप स्पर्धेतील आपल्या दुसऱ्या सामन्यात नामिबियावर मात केली. भारताने हा सामना 93 धावांनी जिंकला.
भारताचा हा या स्पर्धेतील सलग आणि एकूण दुसरा विजय ठरला. कॅप्टन सूर्याच्या नेतृत्वात भारताने ही कामगिरी केली.
विराट कोहलीची जर्सी घातलेला एक चाहता या सामन्यादरम्यान मैदानात घुसला.
मैदानात घुसलेल्या हा चाहता हार्दिक पंड्याच्या दिशेने गेला. हार्दिकने त्याच्या चाहत्यांना मिठी मारली.
मात्र मैदानात घुसलेल्या या तरुणाला पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतलं.
मैदानात घुसलेल्या चाहत्यावर कॅप्टन सूर्या काहीसा नाराज झालेला दिसला. सूर्याला चाहत्याने मैदानात घुसखोरी करणं पटलं नाही.
दरम्यान टीम इंडिया या मोहिमेतील आपला तिसरा सामना हा 15 फेब्रुवारीला पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे.