4 जून 2026
Created By: संजय पाटील
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 100 सामन्यांमध्ये अंपायर म्हणून योगदान देणारे 5 पेक्षाही कमी पंच आहेत.
रॉड टकर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये पंच म्हणून ऐतिहासिक शतक पूर्ण केलंय. टकर अशी कामगिरी करणारे ऑस्ट्रेलियाचे पहिले पंच ठरलेत.
इंग्लंड-न्यूझीलंड पहिल्या कसोटीसाठी मैदानात उतरताच टकर यांच्या नावावर या विक्रमाची नोंद झाली.
स्टीव्ह बकनर हे 100 कसोटी सामन्यांत पंचगिरी करणारे पहिले पंच आहेत. बकनर यांनी 2005 साली ही कामगिरी केली होती.
बकनर यांना कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 128 सामन्यांत निर्णय देण्याचा अनुभव आहे.
तर सर्वाधिक 145 कसोटी सामन्यांत पंचगिरी करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड हा पाकिस्तानच्या अलीम डार यांच्या नावावर आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या रुडी कोएर्टझन यांनी 108 कसोटी सामन्यांमध्ये अंपायरिंग केली आहे.