टी 20I क्रिकेटमध्ये वेगवान 3 हजार धावा करणारे 7 फलंदाज, नंबर 1 कोण?

22 फेब्रुवारी  2026

Created By:  संजय पाटील

पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज मोहम्मद रिझवान याने टी 20I क्रिकेटमध्ये वेगवान 3 हजार धावा  केल्या आहेत. रिझवानने 79 डावांत ही कामगिरी केली आहे.

विराट कोहल दुसऱ्या स्थानी आहे. भारताच्या माजी फलंदाजाने 81 डावात 3 हजार धावा करण्याची कामगिरी केली आहे. विराटने 2021 साली इंग्लंड विरुद्ध 3 हजार धावांचा टप्पा गाठला होता.

पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज बाबर आझम याने 81 डावांत 3 हजार टी 20I धावा करण्याची कामगिरी केली होती. बाबरने 2022 मध्ये हा कारनामा केला होता.

युएईच्या मुहम्मद वसीम याने 2025 साली ओमना विरूद्धच्या सामन्यात टी 20I क्रिकेटमध्ये 3 हजार धावा पूर्ण केल्या होत्या.  वसीमने 84 डावांत ही कामगिरी करुन दाखवली होती.

ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर फलंदाज एरॉन फिंच याने 2022 मध्ये इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात 3 हजार टी 20I धावा पूर्ण केल्या होत्या. फिंचने 98 डावांत ही कामगिरी केली होती.

टीम इंडियाचा टी 20I कर्णधार सूर्यकुमार यादव याने 2026 वर्षात न्यूझीलंड विरुद्ध 3 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. सूर्याने 98 डावांत ही कामगिरी केली होती.

न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टील याने स्कॉटलंड विरुद्ध 2021 साली 3 हजार टी 20I धावा पूर्ण केल्या होत्या. मार्टीनने 101 डावांत ही कामगिरी केली होती.