29 मार्च 2026
Created By: संजय पाटील
संजू सॅमसन याने आयपीएल स्पर्धेत कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध 119 धावा केल्या होत्या.
मयंक अग्रवाल याने पंजाब किंग्सकडून कर्णधार म्हणून पदार्पणातील सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध 99 धावा केल्या होत्या.
श्रेयस अय्यर याने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध नाबाद 93 धावांची खेळी साकारली होती.
फाफ डु प्लेसीस याने पंजाब किंग्स विरुद्ध कॅप्टन म्हणून पदार्पण करताना 88 धावा केल्या होत्या.
किरोन पोलार्ड याने मुंबईचा कॅप्टन म्हणून त्याच्या पहिल्या सामन्यात धमाका केलेला. पोलार्डने पंजांब विरुद्ध 83 धावा केल्या होत्या.
सनरायजर्स हैदराबादकडून इशान किशन याने 19 व्या मोसमातून कर्णधार म्हणून पदार्पण केलं. इशानने या सामन्यात 80 धावा केल्या.
मनीष पांडे याला सनरायजर्स हैदराबादमुळे कर्णधार म्हणून संधी मिळाली. मनीषने कर्णधार म्हणून पहिल्याच डावात मुंबई इंडियन्स विरुद्ध 69 धावा केल्या होत्या.