25 फेब्रुवारी 2026
Created By: संजय पाटील
इंग्लंडच्या एलेक्स हेल्स याने 2014 च्या टी 20i वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेविरुद्ध शतक केलं होतं. हेल्सने नॉट आऊट 116 रन्स केल्या होत्या.
ख्रिस गेल याने 2016 मध्ये इंग्लंड विरुद्ध नॉट आऊट शतक झळकावलं होतं. गेलने नाबाद 100 धावा केल्या होत्या.
श्रीलंकेचा ओपनर पाथुम निसांका याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2026 च्या टी 20i वर्ल्ड कपमध्ये शतक केलं होतं.
इंग्लंडच्या हॅरी ब्रूक याने 2026 च्या टी 20i वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध शतक ठोकलं.
हॅरीने पाकिस्तान विरुद्ध 50 चेंडूत आणि 200 च्या स्ट्राईक रेटने शतक झळकावलं होतं.
हॅरीने या शतकी खेळीत 10 चौकार आणि 4 षटकार लगावले होते.
हॅरीने या शतकासह वर्ल्ड रेकॉर्ड केला. हॅरी टी 20i वर्ल्ड कपमध्ये शतक करणारा पहिलाच कर्णधार ठरला.