20 फेब्रुवारी 2026
Created By: संजय पाटील
टीम इंडियाने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सलग सामने जिंकण्याचा महारेकॉर्ड केला आहे.
भारताने साखळी फेरीत नेदरलँड्सला 17 धावांनी पराभूत करत ही कामगिरी केली.
भारताने या विजयासह टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील सलग 12 वा विजय मिळवला.
भारत यासह टी 20i क्रिकेटमध्ये सलग इतके सामने जिंकणारा पहिलाच संघ ठरला. याआधी हा विक्रम संयुक्तरित्या अनेक तगड्या संघांच्या नावावर होता.
टीम इंडियाने टी 20i वर्ल्ड कपप्रमाणे एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतही अशी कामगिरी केली आहे.
टीम इंडियाने 2011 आणि 2015 या 2 वर्ल्ड वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत सलग 11 सामने जिंकत आपला ठसा उमटवला होता.
सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत साखळीनंतर आता टीम इंडिया सुपर 8 साठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया 22 फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार आहे.