7 जून 2026
Created By: संजय पाटील
टीम इंडियाने अफगाणिस्तान विरुद्ध पहिल्या डावात 564 धावा केल्या. मोहम्मद सिराजने अखेरच्या क्षणी फटकेबाजी केली.
सिराजने 10 व्या स्थानी येत फटकेबाजी केली. सिराजने 12 बॉलमध्ये 22 रन्स केल्या.
सिराजने या खेळीत 4 चौकार आणि 1 षटकार लगावला. तसेच सिराजने 183.33 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या.
मोहम्मद सिराज याच्यासाठी ही खेळी फार खास ठरली. त्याचं कारणही तसंच आहे.
मोहम्मद सिराज याने कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा 20 पार मजल मारली.
सिराजने याआधी कसोटीत एका डावात सर्वाधिक नाबाद 16 धावा केल्या होत्या.
सिराज टीम इंडियाच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे. सिराजने भारताला अनेकदा विजयी करण्यात प्रमुख भूमिका बजावली आहे.