सूर्यासेना झिंबाब्वे विरुद्ध भिडण्यासाठी सज्ज, Super 8 मध्ये कोण जिंकणार?

25 फेब्रुवारी  2026

Created By:  संजय पाटील

टीम इंडिया सुपर 8मधील आपल्या दुसऱ्या सामन्यात झिंबाब्वे विरुद्ध भिडणार आहे. 

हा सामना गुरुवारी 26 फेब्रुवारीला चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे.

टीम इंडियाच्या खेळाडूंनी या सामन्यासाठी जोरदार सराव केला. बीसीसीआयने सरावाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

अभिषेक शर्मा याने 4 सामन्यात बॅटिंगने निराशा केली. त्यामुळे अभिषेक शर्मा याला डच्चू मिळणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे. 

अभिषेक शर्मा याच्या जागी संजू सॅमसन याला संधी मिळू शकते. संजूने खूप सराव केला.  

टीम इंडियासाठी सेमी फायनलच्या हिशोबाने झिंबाब्वे विरुद्धचा हा सामना फार महत्त्वाचा आणि करो या मरो असा आहे. 

त्यामुळे आता टीम इंडिया झिंबाब्वे विरुद्ध या सामन्यात कशी कामगिरी करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.