2 मे 2026
Created By: संजय पाटील
क्रिकेटर पृथ्वी शॉ याने त्याची होणारी पत्नी आकृती अग्रवाल हीच्या जन्मनिमित्ताने खास पोस्ट केली आहे.
पृ्थ्वीने आकृतीसोबतचे फोटो पोस्ट केलेत. "वाढदिवसाच्या शुभेच्छा आकृती. तु माझ्यासाठी किती महत्त्वाची आहेस हे कुणीही आणि कधीही समजू शकणार नाही", असं पृथ्वीने म्हटलंय.
"माझी निवड करण्यासाठी, माझ्यावर प्रेम करण्यासाठी आणि या वेड्या विश्वात माझी सोबती बनण्यासाठी आभारी. मी प्रत्येक वेळेस तुलाच निवडेन", असं पृथ्वीने आकृतीला आश्वासन दिलंय.
पृथ्वी आणि आकृती या दोघांचा अवघ्या काही दिवसांआधी मार्च महिन्यात साखरपूडा झाला होता.
आकृती अग्रवाल सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. तसेच आकृती एक युट्यूबरही आहे.
तसेच पृथ्वी शॉ सध्या आयपीएल 2026 स्पर्धेत दिल्ली कॅपिट्ल्सचं प्रतिनिधित्व करत आहे. मात्र पृथ्वीला या मोसमात प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळाली नाहीय.
पृथ्वी आतापर्यंत आयपीएल स्पर्धेत एकूण 79 सामने खेळला आहे. तसेच पृथ्वीच्या नेतृत्वात टीम इंडियाने अंडर 19 वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली होती.