7 मार्च 2026
Created By: संजय पाटील
टीम इंडियाचा ओपनर संजू सॅमसन याने सेमी फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध 89 धावांची चाबूक खेळी केली.
संजूने 89 धावा करुन भारताच्या विजयात प्रमुख योगदान दिलं. संजूला या खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20i वर्ल्ड कप 2024 फायनलमध्ये potm पुरस्कार जिंकला होता. विराटने त्या सामन्यात 76 धावांची खेळी केली होती.
अक्षर पटेल याने टी 20i वर्ल्ड कप 2024 सेमी फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध 3 विकेट्स आणि 10 धावा केलेल्या. अक्षरला या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्कारने गौरवण्यात आलं होतं.
विराट कोहली याने 2014 मध्ये वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 72 धावांची खेळी केली होती. विराटला त्या खेळीसाठी potm पुरस्कारने सन्मानित केलं गेलं.
इरफान पठाण याने टी 20i वर्ल्ड कप 2007 च्या फायनलमध्ये 3 विकेट्स घेतल्या होत्या. त्यासाठी इरफानला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता.
युवराज सिंहने 2007 च्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 70 धावा केल्या होत्या. युवराजला त्यासाठी सामनावीर पुरस्कारने सन्मानित केलं होतं.