तब्बल 1426 षटकार आणि 27 हजारपेक्षा अधिक धावा, 19 व्या मोसमातील 6 महारेकॉर्ड्स, जाणून घ्या

1 जून 2026

Created By:  संजय पाटील

आयपीएल स्पर्धेतील 19 वा मोसम फलंदाजांनी  गाजवला. या हंगामात फलंदाजीसह झालेल्या 6 महाविक्रमांबाबत जाणून घेऊयात.

19 व्या  हंगामातील  एकूण 74 सामन्यांत 1426 षटकारांसह एकूण 27 हजार 450 धावांची नोंद करण्यात आली.

यंदा 19 व्या मोसमात क्रिकेट चाहत्यांना षटकार आणि चौकारांचा पाऊस पाहायला मिळाला. याआधी कोणत्याही मोसमात इतक्या चौकार-षटकारांची नोंद झाली नव्हती.

आयपीएल 19 व्या मोसमात एकूण 2 हजार 332 चौकारांची नोंद झाली. आतापर्यंत याआधी कोणत्याही एका मोसमात इतक्या चौकारांची नोंद झाली नव्हती.

या 19 व्या मोसमात तब्बल 15 शतकांची नोंद करण्यात आली. फलंदाजांनी धमाका केला.

19 व्या मोसमात एकूण 65 वेळा 200 पेक्षा अधिक धावा करण्यात आल्या. तर 17 वेळा 200 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्यात आला.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील महाविजेता ठरली.