भुवनेश्वरने यॉर्कर किंगला पछाडलं, जसप्रीतला विकेट न घेणं महागात

28 एप्रिल 2026

Created By:  संजय पाटील

आरसीबीचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने आतापर्यंत IPL 2026 मध्ये जबरदस्त कामगिरी केलीय. भुवीने दिल्ली विरूद्धच्या सामन्यात कमाल केली.

भुवीने दिल्ली विरुद्ध 3 ओव्हरमध्ये 5 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. भुवीने यासह यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याला पछाडलं.

भुवीच्या नावावर आतापर्यंत टी 20 क्रिकेटमध्ये 349 विकेट्स झाल्या आहेत. भुवी अशाप्रकारे सर्वाधिक टी 20 विकेट्स मिळवणारा दुसरा भारतीय ठरला आहे.

भुवीने यासह बुमराहला मागे टाकलं आहे. बुमराहने 347 विकेट्स घेतल्या आहेत. तर युझवेंद्र चहल हा 388 विकेट्ससह पहिल्या स्थानी आहे.

भुवीला आगामी सामन्यात 1 विकेट घेऊन मोठी कामगिरी करण्याची संधी आहे. भुवीला 350 टी 20 विकेट्स घेणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज होण्याची संधी आहे.

भुवीने आतापर्यंत आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील एकूण 8 सामन्यांमध्ये 14 विकेट्स मिळवल्या आहेत. 

ताज्या आकडेवारीनुसार, भुवी पर्पल कॅपच्या शर्यतीत पहिल्या स्थानी आहे.