18 मार्च 2026
Created By: संजय पाटील
धोनी चुकतोय, असं एबी डी व्हीलियर्सने म्हटलंय. एबीने धोनीवर सीएसकेत असण्यावरुन प्रश्न उपस्थित केलेत.
एबी डी व्हीलियर्सने स्टार स्पोर्ट्ससोबत बोलताना धोनीच्या बॅटिंगवरुन प्रतिक्रिया दिली.
धोनी नेतृत्वाशिवाय आठव्या किंवा नवव्या स्थानी बॅटिंग करण्याबाबत विचार करत असेल तर चुकीचं आहे, असं एबीने म्हटलं.
एबीनुसार, धोनी आठव्या-नवव्या स्थानी खेळणार असेल तर त्यापेक्षा त्याचं टीममध्ये नसणं उत्तम. माझ्यानुसार तो टीममध्ये विनाकारण 1 जागा अडवून आहे, असं एबीने म्हटलं.
"अशा परिस्थितीत दुसऱ्या खेळाडूला संधी द्यावी जो टीमला ट्रॉफी जिंकून देऊ शकेल", असंही एबीने म्हटलं.
जरं असं नाही झालं तर धोनीचं आठव्या किंवा नवव्या स्थानी खेळण्याचा टीमवर परिणाम होईल, अशी भीती एबीने व्यक्त केली.
तसेच धोनी 19 व्या मोसमात संपूर्ण सामने खेळणार की Impact player म्हणून सहभागी होणार? हे देखील स्पष्ट नाही.