धोनीचं कमबॅक केव्हा? कॅप्टन ऋतुराजने काय सांगितलं?

5 एप्रिल 2026

Created By:  संजय पाटील

चेन्नईचा अनुभवी विकेटकीपर फलंदाज आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी टीममधून बाहेर आहे.

धोनीला दुखापतीमुळे आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमातील सीएसकेच्या पहिल्या 3 सामन्यांना मुकावं लागलं आहे. 

त्यामुळे धोनी केव्हा कमबॅक करणार? याची प्रतिक्षा क्रिकेट चाहत्यांना लागून राहिली आहे.

सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने पंजाब किंग्स विरूद्धच्या सामन्याआधी धोनीबाबत अपडेट दिली.

"एमएस हळूहळू सावरत आहे. कधीकधी यासाठी थोडा वेळ लागतो", असं ऋतुराजने टॉसंनतर म्हटलं. 

तसेच जर तो खेळण्यासाठी सज्ज असेल, तर तो लवकरच मैदानात उतरेल", असंही ऋतुराजने स्पष्ट केलं. 

दरम्यान चेन्नईची या 19 व्या मोसमात निराशाजनक सुरुवात राहिली आहे. चेन्नईने सलग 3 सामने गमावले आहेत.