आयपीएलमध्ये सर्वात जास्त वेळा झिरोवर आऊट होणारा ओपनर कोण? जाणून घ्या

20 एप्रिल 2026

Created By:  संजय पाटील

आयपीएल स्पर्धेत ओपनर म्हणून सर्वाधिक वेळा  झिरोवर आऊट होण्याचा नकोसा विक्रम आता अजिंक्य रहाणे याच्या नावावर झाला आहे. 

अजिंक्य रहाणे आयपीएल स्पर्धेत ओपनिंग करताना एकूण 12 वेळा झिरोवर आऊट झाला आहे.

अजिंक्य आयपीएल स्पर्धेतील गेल्या 2 डावांत गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स विरुद्ध झिरोवर आऊट झाला आहे.

अजिंक्यआधी हा विक्रम पार्थिव पटेल याच्या नावावर होता. पार्थिव ओपनिंग करताना एकूण 11 वेळा झिरोवर आऊट झाला होता.

पार्थिवनंतर तिसऱ्या स्थानी माजी फलंदाज शिखर धवन आहे. गब्बर एकूण 10 वेळा भोपळा न फोडता माघारी परतला होता.

गौतम गंभीर आयपीएल स्पर्धेत ओपनिंग करताना 10 वेळा झिरोवर आऊट झाला.

डावखुरा फलंदाज डेव्हिड वॉर्नर याला ओपनिंग करताना एकूण 9 वेळा झिरोवर माघारी परतावं लागलं होतं.