आयपीएलच्या 19 व्या मोसमातील सर्वात कमी पगार असलेला कॅप्टन कोण?

25 मार्च  2026

Created By:  संजय पाटील

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत सर्वात महागडा खेळाडू आहे. पंतसाठी लखनौने  27 कोटी रुपये मोजले आहेत.

श्रेयस अय्यर दुसरा सर्वात महागडा कर्णधार आहे.  श्रेयससाठी पंजाब किंग्सने 26 कोटी 75 लाख रुपये मोजले आहेत.

सनरायजर्स हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्स आणि सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड या दोघांना 19 व्या मोसमासाठी प्रत्येकी 18 कोटी रुपये मिळाले आहेत.

ऑलराउंडर अक्षर पटेल याच्यासाठी दिल्ली कॅपिट्ल्सने 16 कोटी 50 लाख रुपये मोजले आहेत.

हार्दिक पंड्या मुंबईचा कर्णधार आहे. पंड्याला एका मोसमासाठी 16 कोटी  35 लाख रुपये मिळतात.

रियान पराग यंदा राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व करणार आहे. रियानसाठी राजस्थानने 14 कोटी रुपये खर्च केले आहेत.

अजिंक्य रहाणेचा कर्णधार म्हणून सर्वात कमी पगार आहे. केकेआरने अजिंक्यसाठी 1 कोटी 50 लाख रुपये मोजले आहेत.