IPL 2026 : केकेआरच्या नावावर नकोसा विक्रम, नक्की काय झालं?

24 एप्रिल 2026

Created By:  संजय पाटील

केकेआरची आयपीएल 2026 स्पर्धेत निराशाजनक कामगिरी राहिली आहे. केकेआरला 7 सामन्यानंतर फक्त एकमेव सामना जिंकता आला आहे.

केकेआरने आतापर्यंत 7 पैकी 5 सामने गमावले आहेत. एका सामन्यात त्यांनी विजय मिळवलाय. तर एक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.

केकेआर या स्पर्धेच्या इतिहासात 6 मॅचेसनंतरही एकही सामना न जिंकणारी पाचवी टीम ठरलीय.

केकेआरआधी डेक्कन चार्जर्स (2012), दिल्ली (2013), RCB (2019) आणि मुंबई (2022) या संघांना 6 सामन्यानंतरही विजयाचं खातं उघडता आलं नव्हतं.

केकेआरने 19 एप्रिलला आपल्या मोहिमेतील सातव्या सामन्यात विजयाचं खातं उघडलं. केकेआरने राजस्थानला पराभूत करत पहिला विजय मिळवला.

केकेआरच्या खात्यात 7 सामन्यानंतर फक्त 3 गुण आहेत. केकेआर पॉइंट्स टेबलमध्ये दहाव्या स्थानी आहे. 

दरम्यान केकेआरचा या मोहिमेतील आठवा सामना हा 26 एप्रिलला लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध होणार आहे.