IPL 2026 : मुंबई, दिल्ली-चेन्नईपैकी कोणत्या संघांकडून सर्वाधिक खेळाडू खेळले?

29 एप्रिल 2026

Created By:  संजय पाटील

चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्ससाठी आतापर्यंत आयपीएलचा 19 वा मोसम काही खास राहिलेला नाही.

विजयी होण्यासाठी संघात अनकेदा बदल केला जातो. या निमित्ताने कोणत्या संघाने प्लेइंग ईलेव्हनमध्ये सर्वाधिक वेळा बदल केलाय हे जाणून घेऊयात.

मुंबई प्लेइंग ईलेव्हनमध्ये सर्वाधिक खेळाडूंना संधी देणारी टीम ठरली आहे. मुंबईने 25 पैकी सर्वाधिक खेळाडूंना प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी दिलीय.

मुंबईने 19 व्या मोसमात 8 सामन्यांपर्यंत 22 खेळाडूंना प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी दिली आहे.

मुंबईला या मोसमात अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. सर्वोत्तम प्लेइंग ईलेव्हनसाठी मुंबईकडून 22 खेळाडूंना संधी देण्यात आलीय.

मुंबईनंतर दिल्ली आणि चेन्नईने सर्वाधिक खेळाडूंना संधी दिलीय. दोन्ही संघांकडून प्रत्येकी 19-19 खेळाडूंना संधी देण्यात आलीय.

तसेच दिल्ली आणि चेन्नईची सारखीच कामगिरी राहिली आहे. दोन्ही संघांना 8 पैकी फक्त 3 सामनेच जिंकता आले आहेत.