28 मे 2026
Created By: संजय पाटील
मुंबई आयपीएल 2026 स्पर्धेत आपल्या मोहिमेतील शेवटचा सामना जिंकण्यात अपयशी ठरली. त्यामुळे मुंबईला नवव्या स्थानी समाधान मानावं लागलं.
मुंबई इंडियन्स टीममधील अनेक स्टार खेळाडू अपयशी ठरले. त्यापैकी एक म्हणजे जसप्रीत बुमराह.
जसप्रीत बुमराहला मुंबईच्या शेवटच्या सामन्यातून विश्रांती देण्यात आली होती. बुमराह अशाप्रकारे 19 व्या मोसमात एकूण 13 सामने खेळला.
बुमराह या मोसमात अपयशी ठरला. बुमराहला 13 सामन्यांत फक्त 4 विकेट्सच घेता आल्या. बुमराहची सरासरी या दरम्यान 102.5 इतकी राहिली.
बुमराहच्या नावावर यासह टी 20 क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वाईट विक्रमाची नोंद झाली आहे.
बुमराह एका टी 20 स्पर्धेत 40 ओव्हर टाकल्यानंतर 100 पेक्षा अधिक सरासरी असणारा पहिला गोलंदाज ठरला.
बुमराह आधी हा विक्रम प्रज्ञान ओझा याच्या नावावर होता. ओझाने 2014 साली आयपीएल स्पर्धेत 95 च्या सरासरीने विकेट्स घेतल्या होत्या.