IPL : बुमराहने कोणत्या मोसमात सर्वात कमी विकेट्स मिळवल्या?

25 मे 2026

Created By:  संजय पाटील

मुंबई इंडियन्सचा प्रमुख आणि अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्यासाठी आयपीएलचा 19 वा मोसम निराशाजनक राहिला.

बुमराहला या 19 व्या मोसमात एकूण 5 विकेट्सही घेता आल्या नाहीत. 

बुमराह मुंबईसाठी 19 व्या मोसमात 13 सामने खेळला. बुमराहने या सामन्यांत 4 विकेट्स मिळवल्या.

मात्र बुमराहची याआधीही काही हंगामात यापेक्षा वाईट कामगिरी राहिली आहे.

बुमराहने 2013 आणि 2015 साली प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या होत्या. बुमराहसाठी हा मोसम कधीही न विसरता येणारा आहे.

मात्र बुमराहला 2013 आणि 2015 साली दोन्ही मोसमात प्रत्येकी 2-2 सामनेच खेळण्याची संधी मिळाली होती.

तसेच बुमराहने आयपीएल स्पर्धेत 2014 साली 11 सामन्यांत 5 विकेट्स घेतल्या होत्या. बुमराहने त्या व्यतिरिक्त प्रत्येक मोसमात किमान 15 विकेट्स घेतल्या आहेत.