IPL 2026 : थाला धोनीकडून CSK च्या 3 खेळाडूंचा खास सन्मान, कारण..

23 मार्च  2026

Created By:  संजय पाटील

चेन्नई सुपर किंग्स  19 व्या मोसमासाठी सज्ज झाली आहे. सीएसकेचा या हंगामात धमाका करण्याचा प्रयत्न असणार आहे.

त्याआधी सीएसकेच्या माजी खेळाडूंचं रियुनियन झालं. सीएसके टीममधील अनेक माजी खेळाडू यलो जर्सीत एकत्र आले. 

सोमवारी 23 मार्चला चेपॉक स्टेडियममध्ये सीएसकेचे माजी दिग्गज एकत्र जमले. यामध्ये मायकल हसी, मॅथ्यू हेडन,  सुरेश रैन आणि इतर खेळाडू उपस्थित होते.

धोनीने या कार्यक्रमादरम्यान सीएसके टीममधील तिघांना सन्मानित केला. भारताला वर्ल्ड कप जिंकून देणार्‍या तिघांचा धोनीने सन्मान केला.

धोनीने सीएसकेत नव्याने आलेल्या संजू सॅमसन याला फ्रेम भेट दिली. संजू टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिला.

धोनीने संजू व्यतिरिक्त ऑलराउंडर शिवम दुबे यालाही सन्मानित केलं. शिवमने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत बॅटिंग आणि बॉलिंगने दुहेरी योगदान दिलं. 

आयुष म्हात्रे याने त्याच्या नेतृत्वात भारताला अंडर 19 वर्ल्ड कप जिंकून दिला. धोनीने यासाठी आयुषला सन्मानित केलं.