IPL : दिग्गज महेंद्रसिंह धोनीचा हा रेकॉर्ड कोण ब्रेक करणार?

19 एप्रिल 2026

Created By:  संजय पाटील

धोनीच्या नावावर यशस्वी विजयी धावांचा पाठलाग करताना 20 व्या ओव्हरमध्ये सर्वाधिक वेळा 10 किंवा त्यापेक्षा जास्त धावांचा विक्रम आहे. 

महेंद्रसिंह धोनीने 8 वेळा यशस्वी विजयी धावांचा पाठलाग करताना 20 व्या ओव्हरमध्ये 10 आणि त्यापेक्षा जास्त धावा केल्यात.

डेव्हिड मिलर याची आरसीबी विरुद्ध अशी कामगिरी करण्याची कारकीर्दीतील एकूण चौथी वेळ ठरली.

मिलरने यासह किरॉन पोलार्ड आणि ड्वेन ब्राव्हो यांच्या विक्रमाची बरोबरी केली.

राहुल तेवतिया याने यशस्वीपणे 3 वेळा रन चेज करताना 20 व्या षटकांत 10 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

तसेच आयपीएल स्पर्धेत एकूण 4 फलंदाजांनी यशस्वीपणे रन चेज करताना 2 वेळा 20 व्या ओव्हरमध्ये 10 पेक्षा अधिक धावा केल्यात.

या 4 फलंदाजांमध्ये रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, दिनेश कार्तिक आणि स्टीव्हन स्मिथ यांचा समावेश आहे.