2 जून 2026
Created By: संजय पाटील
आरसीबीने आपला दबदबा कायम राखत रजत पाटीदार याच्या नेतृत्वात सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली.
आरसीबीने 31 मे रोजी अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सवर मात करत आयपीएल चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला.
आरसीबी यासह चेन्नई आणि मुंबईनंतर सलग 2 ट्रॉफी जिंकणारी तिसरी टीम ठरली.
विराट, रजत आणि भुवनेश्वर या तिघांची ट्रॉफी जिंकण्याची सलग दुसरी वेळ ठरली. तर 2 खेळाडूंनी ट्रॉफी जिंकण्याची हॅट्रिक पूर्ण केली.
सुयश शर्मा आणि फिल सॉल्ट या दोघांची ट्रॉफी जिंकण्याची ही सलग तिसरी वेळ ठरली
सुयश आणि फिल हे दोघे 2024 सालच्या आयपीएल विजेत्या केकेआर टीमचे सदस्य होते.
आरसीबीने 2025 साली फिल आणि सुयश या दोघांना आपल्या गोटात घेतलं. दोघांनी आरसीबीला चॅम्पियन करण्यात योगदान दिलं.