18 मार्च 2026
Created By: संजय पाटील
आयपीएलच्या 19 व्या मोसमाआधी 10 संघ सर्वोत्तम प्लेइंग ईलेव्हनची जुळवाजुळव करतायत. या निमित्ताने आपण 19 व्या मोसमातील सर्वात महागड्या प्लेइंग ईलेव्हनबाबत जाणून घेऊयात.
विराट कोहली याला आरसीबीने 21 कोटी रुपयांत रिटेन केलंय. कोहली चालला तर तो काय करु शकतो हे चाहत्यांना माहितीय.
यशस्वी जैस्वाल याच्यासाठी राजस्थान रॉयल्सने 18 कोटी रुपये मोजले आहेत. राजस्थानने त्याला रिटेन केलंय.
श्रेयस अय्यर पंजाब किंग्सचा कॅप्टन आहे. श्रेयससाठी पंजाब किंग्सने 26 कोटी 75 लाख रुपये मोजले आहेत.
केकेआरने ऑलराउंडर कॅमरुन ग्रीन याच्यासाठी 25 कोटी 20 लाख रुपये मोजले आहेत. ग्रीनच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष असणार आहे.
ऋषभ पंतकडे लखनौ सुपर जायंट्सच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. पंतसाठी फ्रँचायजीने 27 कोटी रुपये मोजले आहेत.
दक्षिण आफ्रिकेच्या हेन्रिक क्लासेन याच्यासाठी सनरायजर्स हैदराबादने 23 कोटींचा बोली लावली होती.
मुंबईने हार्दिक पंड्यासाठी 16 कोटी 35 लाख रुपये मोजले आहेत. तर अक्षर पटेलसाठी डीसीने 16 कोटी 50 लाख खर्चले आहेत. दोघेही कर्णधार आहेत.
जसप्रीत बुमराह आणि राशीद खान दोघेही मॅचविनर गोलंदाज आहेत. या दोघांचा भाव हा प्रत्येकी 18 कोटी रुपये आहे.
अर्शदीप सिंह आणि मथीशा पथिराणा या दोघांचाही भाव प्रत्येकी 18 कोटी रुपये इतका आहे.